|
|
|
चांगली वधु अथवा वर आपल्या मुलांमुलीकरिता मिळावी हीच अपेक्षा बाळगून अनेक पालक
प्रयत्न करत असतात परंतु अशा स्थ ळाची माहिती उपलब्ध नसलेमुळे त्यांची होणारी
पायपीट थांबावी या हेतूने, तसेच एक सामाजिक कार्य म्हणून त्र्यंबोली मंगल कार्यालय,
डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज समोर लाईन बाजार येथे त्र्यंबोली वधु वर सूचक केंद्र
सुरु केले आहे.
या केंद्रामार्फत सर्व धर्मियांकरिता वधू-वर परिचय मेळावे आयोजित केले जातात. तसेच
या केंद्रामार्फत सर्व धर्मियांची स्थळे उपलब्ध करून दिली जातात. येथे सर्व
धर्मियांकरिता शिक्षित, उच्चशिक्षित स्थळे उपलब्ध आहेत. तसेच या केंद्रामार्फत
पुर्नविवाह,घटस्फोटित, विधवा, विधुर, आंतरजातीय, प्रोढ वधू वर, अपंग व आर्थिक दुर्बल स्थळांना
विशेस सहकार्य केले जाते. परिचय
मेळाव्यासोबतच परगावच्या स्थळांकरिता येथे मुलाखती व दाखविण्याचा कार्यक्रमही
आयोजित केला जातो. यामुळे चांगल्या स्थळांसाठी आता सर्वत्र फिरण्याची गरज नाही आपण
फक्त येथे नोंदणी करा. अशा सामाजीक कार्यात आमच्या कोल्हापूर जिल्हा सामाजीक सेवा व
सांस्कृतिक मंगल कार्यालय संघाचा मोलाचा वाटा असतो . त्याच बरोबर आपणास घर
बसल्या आमच्या वेबसाईटवर स्थळे पहाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
आपला
कृपाभिलाषी
श्री उमेश देसाई
|
|
त्र्यंबोली वधु वर सूचक केंद्र
|
|
|
|
|
Website Registration
|
Online registration with annual subscription of the website
Registration Fees: 1,500 Rs/Year
Fees will be accepted in cash or through DD,cheques.
Click to see the details
|
|
|
|
|
|
 |
|
|
|